Ad will apear here
Next
शेअर्स टप्प्याटप्प्याने घ्या...
नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांचे सर्वच शेअर्स वाढत आहेत. याच क्षेत्रातील मणप्पुरम फायनान्स आणि मुथूट फायनान्स हे शेअर गुंतवणुकीला उत्तम आहेत. शेअर बाजारात सध्या गुंतवणुकीसाठी भरपूर संधी उपलब्ध असल्या, तरी गुंतवणूकदारांनी सर्व शेअर्स एकाच वेळी न घेता टप्प्याटप्याने घ्यावेत. त्यामुळे भावांची सरासरी गाठण्याचा फायदा मिळतो. सध्याच्या गुंतवणूकयोग्य शेअर्सबद्दल जाणून घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात...
.......
गेल्या शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३४ हजार १९२वर आणि निफ्टी १० हजार ४८०वर बंद झाला. सर्वसामान्यपणे आठवडाभर बाजार स्थिरच होता. मार्च २०१८ तिमाहीचे व पूर्ण वर्षाचे आकडे आता प्रसिद्ध होऊ लागले आहेत. इन्फोसिसने या तिमाही १८ हजार ८३ रुपयांचा महसूल दाखवला. त्यावर ३६९० कोटी रुपयांचा करोत्तर नफा मिळाला. शेअरगणिक उपार्जन १६.९७ रुपये होते. मार्च २०१७ तिमाहीचा नक्त नफा ५१२९ कोटी रुपये होता. आधी गुंतवणूकदाराच्या गळ्यातला ताईत असलेला हा शेअर आता तितका आकर्षक राहिलेला नाही. पुढील आठवड्यात क्रिसिल, मुथूट फायनान्स, सिएट, इंडसइंड बँक, टाटा कन्सल्टन्सी, टाटा स्पॉन्ज, एसीसी, एचडीएफसी लाइफ, आरएस सॉफ्टवेअर, एचडीएफसी बँक, भारत फायनान्शियल, थ्री आय इन्फो, फोसिको, चोलामंडलम् फायनान्स, गुजरात नॅशनल फर्टिलझर्स (जीएनएफसी), एलआयसी हाउसिंग यांचे आकडे प्रसिद्ध होतील. 

भारत सरकारने नुकतीच सार्वजनिक क्षेत्रातील मिश्र धातू निगम या कंपनीच्या शेअरची प्राथमिक भागविक्री ९० रुपये दराने केली. नोंदणीनंतर पहिल्याच दिवशी, गेल्या शुक्रवारी या शेअरमध्ये २० टक्क्यांची वाढ होऊन तो ११० रुपयांवर गेला. काही दिवस वाट बघून या शेअरचा अंदाज घेऊन त्यात गुंतवणूक करावी.

नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांचे सर्वच शेअर्स वाढत आहेत. पंधरा दिवसांत बजाज फायनान्स १९१४ रुपयापर्यंत चढला आहे. तो येत्या सात-आठ महिन्यांत २२०० रुपयांची सीमा गाठू शकेल. याच क्षेत्रातील मणप्पुरम फायनान्स आणि मुथूट फायनान्स हे शेअर गुंतवणुकीला उत्तम आहेत. मणप्पुरम फायनान्स शेअर सध्या १२१ रुपयांत उपलब्ध आहे. डिसेंबर अखेर तो २६० रुपये होईल. मुथूट फायनान्सचा शेअरही सध्या ४३२ रुपयांत उपलब्ध आहे. तो ५५० रुपयांपर्यंत वाढू शकेल. शेअर बाजारात सध्या गुंतवणुकीसाठी भरपूर संधी उपलब्ध असल्या, तरी गुंतवणूकदारांनी सर्व शेअर्स एकाच वेळी न घेता टप्प्याटप्याने घ्यावेत. त्यामुळे भावांची सरासरी गाठण्याचा फायदा मिळतो.

कर्नाटकातील निवडणुका संपल्यानंतर, तसेच पावसाळा सुरू झाल्यानंतर मगच बाजारात हळूहळू तेजी सुरू होईल. त्यामुळे गुंतवणूक सबुरीने करायला हवी. गुंतवणुक हे एक शास्त्र आहे, तशीच ती एक कलाही आहे. दर आठवड्यात नवीन नवीन संधी उपलब्ध होत असतातच. अनिल आगरवाल या समूहाच्या कंपनीतील ‘वेदांत’ हा शेअर सध्या गुंतवणुकीस उत्कृष्ट आहे. सध्याच्या २९०वरून तो ४०० रुपयांपर्यंत उडी घेऊ शकतो. 

- डॉ. वसंत पटवर्धन
(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZSOBN
Similar Posts
शेअर्स निवडीत ‘लिक्विडिटी’ महत्त्वाची गुंतवणुकीसाठी शेअर्स निवडताना काय निकष लावायचे याचा विचार करताना आपण SMILES या शब्दाद्वारे प्रतीत होणाऱ्या तत्त्वांचा विचार करत आहोत. त्यातील ‘एल’ (L) म्हणजे लिक्विडिटी (Liquidity). याचा आज परामर्श घेऊ.... ‘समृद्धीची वाट’ या सदरात...
शेअर्सची हलवाहलवी लाभदायी एकदा शेअर्स घेतले म्हणजे झाले, असे होत नसते. त्यांच्या भावातील चढ-उताराकडे लक्ष ठेवून योग्य वेळी त्याची विक्री करून नवीन शेअर्स घेणे, हे महत्त्वाचे ठरते. याबाबत सविस्तर माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात...
विपणक क्षमता शेअर बाजारातील गुंतवणुकीचा श्रीगणेशा करताना SMILE हा शब्द लक्षात ठेवायचा, असे आपण गेल्या रविवारच्या लेखात पाहिले. त्यातील ‘एस’ म्हणजे ‘सेफ्टी’ हे आपण त्या लेखात पाहिले. त्यातील ‘एम’ म्हणजे मार्केटॅबिलिटी (विपणक क्षमता). त्याबद्दल आज पाहू या... ‘समृद्धीची वाट’ या सदरात...
शेअर्स खरेदीसाठी अनुकूल स्थिती शेअर बाजारात सध्या ओहोटी सुरू आहे; मात्र या स्थितीत घाबरून न जाता योग्य शेअर्सची निवड करून खरेदी करणे महत्त्वाचे आहे. त्याबद्दल आणि कोणते शेअर्स सध्या खरेदीयोग्य आहेत याची माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात....

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language